कतारकडून फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेद्वारे इस्लामचा प्रसार !

दोहा (कतार) – येथे चालू असलेल्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेतील सामने  पहाण्यासाठी जगभरातील सहस्रो फुटबॉलप्रेमी आले आहेत. त्यांना इस्लामविषयीची माहिती देण्याचा, तसेच इस्लामचा प्रसार करण्याचा प्रकार कतारकडून करण्यात येत आहे.

१. फुटबॉलप्रेमी सामना पहाण्यासह येथे पर्यटनाचाही आनंद घेत आहेत. दोहा येथे बांधलेली ‘कतारा कल्चरल व्हिलेज’ ही मशीद आकर्षणाचे केंद्र बनली आहे. या मशिदीमध्ये अनेक भाषा बोलणारे पुरुष आणि महिला नेमण्यात आल्या आहेत. हे लोक मशिदीत येणार्‍या लोकांना इस्लामची माहिती सांगतात. एवढेच नाही, तर येथे येणार्‍या पर्यटकांना ‘इलेक्ट्रॉनिक बोर्ड’ पहाण्यास सांगितले जात आहे. या ‘इलेक्ट्रॉनिक बोर्ड’वर ३० हून अधिक भाषांमध्ये इस्लामविषयीची माहिती उपलब्ध आहे, तसेच विविध भाषांमध्ये इस्लामचा ‘परिचय’ करून देणारी पुस्तके येथे ठेवण्यात आली असून ती पर्यटकांना वाटली जात आहेत.

२. कतारच्या अकाफ आणि इस्लामी व्यवहार मंत्रालयाने विश्‍वचषक स्टेडियमच्या बाहेर एक मंडप उभारला असून तेथे पर्यटकांना इस्लाम आणि त्याच्या शिकवणींविषयी ‘प्रबोधन’ केले जात आहे.

३. कतारमध्ये येणार्‍या लोकांवर इस्लामचा प्रभाव पडावा, यासाठी रस्त्यांच्या कडेला बांधलेल्या भिंतींवर महंमद पैगंबर यांच्या म्हणी, कार्ये आणि सवयी लिहिल्या आहेत.

संपादकीय भूमिका

खेळातही धर्म आणणारे इस्लामी देश ! याविषयी कधी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत !