इस्लामिक रेजिस्टेंस कौन्सिल या आतंकवादी संघटनेने घेतले मंगळुरू येथील बाँबस्फोटाचे दायित्व !

आतंकवादी शारीक याच्या अटकेचा सूड घेण्याची धमकी !

बाँबस्फोटाचे दायित्व ‘इस्लामिक रेजिस्टेंस कौन्सिल’ने घेतले

मंगळुरू (कर्नाटक) – येथे काही दिवसांपूर्वी रिक्शामध्ये झालेल्या बाँबस्फोटाचे दायित्व ‘इस्लामिक रेजिस्टेंस कौन्सिल (आय.आर्.सी.) या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतले आहे. अतिरिक्त पोलीस संचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, आम्ही याची सत्यता पडताळत आहोत.

१. सामाजिक माध्यमांतून पोस्ट प्रसारित करून या आतंकवादी संघटनेने म्हटले आहे की, ‘आम्ही इस्लामिक रेजिस्टेंस कौन्सिल संदेश देऊ इच्छितो की, आमचे भाऊ महंमद शारीक याने मंगळुरू येथे भगवा आतंकवाद्यांचा गड कादरीमध्ये हिंदुत्व मंदिररावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात तो त्याच्या उद्देशात यशस्वी हाऊ शकला नाही, तरीही आम्ही याला प्रयत्न आणि रणनीती यांच्या दृष्टीने एक यश मानतो; कारण आमचा भाऊ पसार असतांना केंद्रीय गुप्तचर यंत्रणा त्याचा शोध घेऊ शकली नाही.’

२. याच्या पुढे आलोक कुमार यांना उद्देशातून यात म्हटले आहे की, तुम्हाला आमच्या भावाच्या अटकेचा आनंद थोडेच दिवस मिळणार आहे. लवकरच तुम्हाला याचे फळ मिळणार आहे. आम्ही यासाठीच सूड घेत आहोत; कारण आमच्या धर्माच्या विरोधात उघड युद्ध घोषित करण्यात आले आहे. दमन करणारे कायदे आम्हाला आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी संमत केले जात आहेत.


शारिक करणार होता रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात स्फोट !

शारिक याला १९ नोव्हेंबरला संघाशी संलग्न असलेल्या केशव स्मृती संवर्धन समितीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बाल उत्सव कार्यक्रमात स्फोट घडवायचा होता. विद्यार्थी असल्याचे भासवून त्याने कार्यक्रमात प्रवेश करण्याचे नियोजन केले होते; पण नंतर त्याला योजना पालटावी लागली. या कार्यक्रमात अनुमाने १० सहस्र मुले सहभागी झाली होती. शारिक याने तो हिंदु असल्याचे भासवण्यासाठी खोटे आधारकार्ड आणि एका हिंदूच्या नावाने सिम कार्ड खरेदी केले होते.

संपादकीय भूमिका

‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी बोलतात; मात्र प्रत्यक्षात त्यांच्यातील लोक जिहादी आतंकवादी कारवाया करतात, हिंदूंच्या मुलींचे प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची हत्या करतात, हिंदूंचा शिरच्छेद करतात, यावर ते कधी बोलणार आहेत ?