हिंदु महिलांवरील अत्याचाराच्या घटना न थांबल्यास आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येईल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’ विरोधात येवला येथील हिंदुत्वनिष्ठ मूक मोर्च्याद्वारे एकवटले !

मोर्चाला संबोधित करताना समितीचे श्री. सुनील घनवट

येवला – ‘येवला येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सकल हिंदु समाज यांनी मूक मोर्चा काढला; पण जर या घटना येणार्‍या काळात थांबल्या नाहीत, तर याच येवल्यामध्ये आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येणार आहे. म्हणून सर्वांनी ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात जागृत रहावे आणि संघटित व्हावे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही शासनाकडे मागणी करू की, त्यांनी अधिवेशनामध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा संमत करावा’, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा, या मागणीसाठी येथील हिंदुत्वनिष्ठांनी धडक मूक मोर्चा काढला.

‘वासनांध आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पूनावाला अन् सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात यावा’, अशा मागण्यांचे निवेदन श्री. नीलेश राजेंद्र माडीवाले आणि श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी ६०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी उपस्थित होते.

उपस्थित संघटना

या वेळी श्रीराम नवमी उत्सव समिती, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती,  विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, करणी सेना, श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेना आदी संघटनांनी मोर्च्यामध्ये सहभाग घेतला.