(म्हणे) ‘उंदरांनी ५८१ किलो अमली पदार्थांचा साठा केला फस्त !’

मथुरा पोलिसांचा अजब दावा

न्यायालयाकडून पुरावे सादर करण्याचा आदेश !

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील शेरगड आणि हायवे या पोलीस ठाण्यांच्या गोदामात जप्त केलेला ५८१ किलो मारिजुआना या अमली पदार्थाचा साठा उंदरांनी फस्त केल्याचा अजब दावा पोलिसांनी अमली पदार्थांविषयीच्या विशेष न्यायालयात केला. या अमली पदार्थाचे मूल्य ६० लाख रुपये होते.

पोलिसांच्या या दाव्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायाधिशांनी मथुराचे पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांना याविषयीचे पुरावे सादर करण्याचा आदेश दिला. यासह उंदरांच्या उपद्रवावर उपाययोजना काढण्याची सूचनाही न्यायालयाने दिली आहे. पोलिसांच्या गोदामांमध्ये साठवण्यात आलेल्या अमली पदार्थांचा लिलाव अथवा विल्हेवाट लावणे, यांविषयी न्यायालयाने ५ कलमी निर्देशही दिले आहेत.

संपादकीय भूमिका

  • असा दावा केवळ भारतातील पोलीसच करू शकतात ! ‘पोलिसांनी हा दावा करतांना अमली पदार्थांचे सेवन केले होते का ?’, असा प्रश्‍न कुणाला पडल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • ‘ज्या उंदरांनी हे अमली पदार्थ सेवन केले त्यांना शोधून पोलिसांनी त्यांची तपासणी केली होती का ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो !