व्हर्जिनिया (अमेरिका) येथील वॉलमार्ट दुकानामध्ये झालेल्या गोळीबारात १० जण ठार

व्हर्जिनिया (अमेरिका) – येथील वॉलमार्ट दुकानामध्ये २२ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या गोळीबारात १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्टोअरच्या व्यवस्थापकाने त्यांच्या कर्मचार्‍यांवर गोळ्या झाडायला चालू केले आणि नंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. आठवडाभरात गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. याआधी कोलोरॅडोमधील क्लबमध्ये गोळीबार झाला होता. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, आम्हाला रात्री १० वाजता गोळीबाराची माहिती मिळाली. आम्ही तातडीने घटनास्थळी पोचलो. अनेक लोकांचा मृत्यू झाला होता, लोक घायाळ झाले होते. मृतांचा आकडा आम्ही सध्या सांगू शकत नाही. अन्वेषणानंतरच काहीतरी समोर येईल. घायाळांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • महासत्ता असणार्‍या अमेरिकेचा समाज हा पुढारलेला समजला जातो. असे असतांनाही ‘या समाजात गोळीबारासारख्या घटना का घडतात ?’, याचे उत्तर अमेरिकेकडे नाही, हे लक्षात घ्या !
  • भारतातील अंतर्गत समस्यांमध्ये नाक खुपसणार्‍या अमेरिकेने स्वदेशातील गोळीबाराच्या समस्येकडे लक्ष द्यावे आणि सोडवण्याचा प्रयत्न करावा, असेच भारतियांना वाटते !