अंथरूणावर दिले जात आहे जेवण !

सत्येंद्र जैन यांचा कारागृहातील आणखी एक व्हिडिओ !

आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन

नवी देहली – देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा तिहार कारागृहातील एक व्हिडिओ भाजपकडून प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जैन यांना अंथरूणावर जेवण आणून देण्यात येत आहे आणि ते भोजन करत आहेत, असे दिसत आहे. यापूर्वी जैन यांचा कारागृहात त्यांचे मालीश केले जात असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. आर्थिक अपहाराच्या प्रकरणी जैन अटकेत आहेत.

भाजपने हा व्हिडिओ प्रसारित करून म्हटले आहे की, सत्येंद्र जैन यांना कारागृहामध्ये स्वादिष्ट जेवण दिले जात आहे. केजरीवाल यांनी व्हीआयपींच्या मनोरंजनाची कारागृहामध्ये चांगलीच व्यवस्था केली आहे. मंत्री जैन हे कारागृहात नसून जसे काही रिसॉर्टमध्ये बसून जेवणाचा आनंद घेत असल्याचे वाटत आहे.

संपादकीय भूमिका

कारागृहात बंदीवान असणार्‍या मंत्र्याला विशेष वागणूक देणार्‍या पोलीस प्रशासनातील संबंधित भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करा !