न्यूयॉर्क – जगात प्रत्येक ११ मिनिटांनी एका महिलेची हत्या होते, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँतोनियो गुटेरस यांनी एका अहवालाद्वारे दिली. देहलीतील श्रद्धा आणि मथुरा येथील आयुषी यादव यांच्या हत्यांच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही धक्कादायक माहिती प्रसिद्ध केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी या हत्यांना जगातील मानवाधिकारांचे सर्वांत व्यापक उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जगभरातील सरकारांना त्याविरुद्ध राष्ट्रीय कृती योजना सिद्ध करण्याचे आवाहन केले. (जगभरातील मानवाधिकारवाले आतातरी तोंड उघडतील का ? भारतातील महिला किंवा मुली यांच्या हत्यांना ‘लव्ह जिहाद’ हे मुख्य कारण आहे, हे सत्य मानवाधिकारवाले आणि पुरोगामी स्वीकारतील का ? – संपादक)
गुटेरस यांच्या मते जगात प्रत्येक ११ मिनिटांनी एका महिलेला किंवा मुलीला तिचा प्रियकर, पती, इतर साथीदार किंवा कुटुंबातील सदस्य यांच्याकडून जिवे मारले जाते. २५ नोव्हेंबर या दिवशी साजरा होणार्या ‘महिलावरील हिंसाचार प्रतिबंधक दिन’च्या पूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी हा अहवाल प्रसिद्ध केला.