प्रीतीने साधकांना जोडून ठेवणार्‍या देवद आश्रमातील सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी

१. जवळीक करणे

‘पू. रत्नमालाताई देवद आश्रमात सेवा करतात; परंतु रामनाथी आश्रमातील साधक अनेक वेळा त्यांना सेवेतील अडचणी विचारतात. त्या दूरभाषवरून संबंधित साधकांशी बोलून त्यांची अडचण सोडवतात. त्या दायित्व स्वीकारून साधकांना सेवेत साहाय्य करतात. यावरून त्यांची रामनाथी आश्रमातील साधकांशीही असलेली जवळीक लक्षात येते.

२. तत्त्वनिष्ठ

माझ्याकडून सेवेत काही चूक झाल्यास पू. रत्नमालाताई मला त्या चुकीची तत्त्वनिष्ठतेने जाणीव करून देतात.

३. प्रीती

अ. कोरोना महामारीमुळे काही काळ मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जात नव्हतो; परंतु पू. रत्नमालाताई रामनाथी आश्रमात आल्यावर मला भ्रमणभाष करत असत. तेव्हा मी रामनाथी आश्रमाच्या इथे जाऊन त्यांच्याशी सेवेतील अडचणींच्या संदर्भात बोलत असे. तेव्हा त्या माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या प्रकृतीची आवर्जून विचारपूस करत असत.

आ. एकदा रामनाथी आश्रमातील एका साधकाचा विवाहसोहळा देवद येथील सनातनच्या आश्रमात होणार होता. तेव्हा त्यांनी आम्हाला या सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहायला सांगितले.

अशा सर्व कृतींतून पू. रत्नमालाताईंचा सेवेतील साधकांविषयी असलेला प्रेमभाव मला दिसून आला.’

– श्री. यतीश गावणेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), फोंडा, गोवा. (२३.३.२०२२)