सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत असलेल्या प्रीतीमय मार्गदर्शनाचा १०० टक्के लाभ होण्यासाठी साधकांनी त्वरित कृती केल्यास त्यांना परमानंदाची अनुभूती येऊ शकणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. शर्वरी कानस्कर

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली सूत्रे समजून घेऊन कृतीत आणता येण्यासाठी मनात शिष्यभाव, शिकण्याची स्थिती आणि मनाची स्थिरता आवश्यक असणे : ‘गुरुदेव आपल्याला नेहमी शिकण्याच्या स्थितीत रहायला सांगतात; कारण गुरुदेवांनी आपल्याला एखादी गोष्ट शिकवण्यासाठी वेळ ठरवलेली नसते; पण ते आपल्याला कधीही आणि कुणाच्याही माध्यमातून आपल्या साधनेसाठी आवश्यक असलेली सूत्रे सांगतात. आपण नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहिलो, तर ती सूत्रे आपल्या लक्षात येऊन कृतीत आणता येतील. त्यासाठी आपण नेहमी मनात शिष्यभाव, शिकण्याची स्थिती आणि मनाची स्थिरता ठेवली पाहिजे.

२. बहिर्मुखता आणि अल्प तळमळ यांमुळे साधकांना मार्गदर्शनाचा लाभ न होणे : ‘सत्संग किंवा भावसत्संग यांमधून आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन लाभते; पण आपल्या मनातील असंख्य विचारांमुळे आपण त्यातील ८० टक्के सूत्रे ऐकतो. आपल्यातील बहिर्मुखतेमुळे आपल्याला त्यातील ५० टक्के सूत्रांचे आकलन होते आणि गांभीर्याच्या अभावामुळे आपण त्यातील ३० टक्केच सूत्रे कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो. आपल्यात तळमळही अल्प असल्यामुळे आपण त्यातील केवळ १० टक्केच सूत्रे कृतीत आणतो.

‘गुरुदेवा, तुम्हीच लक्षात आणून दिलेली ही सूत्रे तुमच्या चरणी अर्पण करते. ही सूत्रे मला कृतीत आणता येऊ देत’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना करतेे.’

– गुरुदेवांची,

कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), फोंडा, गोवा. (३.५.२०२२)

कु. शर्वरी कानस्कर