हेडफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकणार्‍या १० कोटी लोकांना बहिरेपणाचा धोका !

जागतिक आरोग्य संघटनेची चेतावणी

जागतिक आरोग्य संघटनेची चेतावणी – हेडफोन्सचा धोका ! (चित्रावर क्लिक करा)

वॉशिंग्टन – जगभरातील अनुमाने १० कोटी लोकांना हेडफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यामुळे बहिरेपणाचा धोका निर्माण झाला आहे, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. वास्तविक अनेकांना हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकायला आवडते. त्यामुळे ही चेतावणी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, असे म्हटले जात आहे.

‘बी.एम्.जे. ग्लोबल हेल्थ जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार हेडफोनसह मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने श्रवणशक्ती अल्प होण्याचा धोका वाढतो. या संशोधनानुसार ४३ कोटींपेक्षा अधिक लोक सध्या ऐकण्याच्या दुर्बलतेने ग्रस्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार वर्ष २०५० पर्यंत ही संख्या ७० कोटींपर्यंत पोचेल. जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी तरुणांना सतर्क केले आहे. या संशोधनात इंग्रजी, फ्रेंच आणि रशियन भाषांत गेल्या दोन दशकांमध्ये प्रकाशित झालेल्या ३३ अभ्यासांमधील आकडेवारीद्वारे निष्कर्ष काढण्यात आला आहे.