काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी कापला मंदिराच्या आकाराचा केक !

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ मंदिराच्या आकाराचा केक कापताना

भोपाळ (मध्यप्रदेश) – काँग्रेसचे नेते तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंदिराच्या आकाराचा केक कापल्याची संतापजनक कृती केली आहे. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाला आहे. या व्हिडिओत कमलनाथ मंदिराच्या आकाराचा केक कापतांना दिसत आहेत. या केकवर भगवा झेंडा आणि हनुमानाचा फोटोदेखील दिसून येत आहे. १८ नोव्हेंबरला कमलनाथ यांचा वाढदिवस आहे. छिंदवाडाच्या तीन दिवसीय भेटीवर असतांना त्यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांकडून साजरा करण्यात आला. या वेळी हा प्रकार घडला.

हा हिंदु धर्माचा अवमान ! – मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘‘कमलनाथ आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हे खोटे भक्त आहेत. त्यांचा देवाशी काहीही संबंध नाही. श्रीराममंदिराला विरोध करणार्‍या पक्षाचे ते प्रतिनिधित्व करतात. या भूमिकेचा निवडणुकीत फटका बसत असल्याचे जाणवताच ते हनुमानभक्त झाले. कमलनाथ यांनी हनुमानाचा फोटो असलेला केक कापला, हा हिंदु धर्मासह सनातन संस्कृतीचा अपमान आहे.’’

संपादकीय भूमिका

  • रामसेतू तोडणार्‍या, भरतपूर (राजस्थान) येथील हिंदूंचे पवित्र पर्वत नष्ट करणार्‍या आणि आता मंदिराच्या आकाराचा केक कापणार्‍या काँग्रेसलाच हिंदूंनी राजकीयदृष्ट्या नष्ट करणे आवश्यक आहे !
  • कमलनाथ यांच्या कृतीवरून काँग्रेसचा पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो ! हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणार्‍या कमलनाथ यांना मध्यप्रदेशमधील भाजप सरकारने कारागृहातच टाकले पाहिजे !