केरळमध्ये बलात्कार पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा पोलीस अधिकारी फरार !

अतिरिक्त उपनिरीक्षक ए.जे. बाबू

वायनाड (केरळ) – येथील बलात्कार पीडित असणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अतिरिक्त उपनिरीक्षक पदावर असलेला ए.जे. बाबू नामक पोलीस अधिकार्‍याच्या विरोधात मागासवर्गीय आयोगाने तक्रार प्रविष्ट करताच तो फरार झाला आहे.

१. वायनाड जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्याचे अन्वेषण करण्याच्या निमित्ताने पोलिसांनी तरुणीला उटी येथे नेले होते.

२. त्यावेळी गाडीमध्ये महिला पोलीस आणि अन्य कुणी नसल्याचा अपलाभ उठवत बाबू याने तिचे लैंगिक शोषण केले. यावेळी बाबू याने तिला उद्देशून अश्‍लील शब्दांचा वापर केला आणि तिच्या संमतीशिवाय तिची छायाचित्रे काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

३. सामाजिक कार्यकर्त्या पी.ई. उषा म्हणाल्या की, जुलै २०२२ मध्ये घडलेल्या या प्रकरणाची तक्रार नोंदवून घ्यायला पोलिसांनी नकार दिला. (अशा समाजद्रोही पोलिसांवर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक) प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी येताच पोलिसांना तक्रार प्रविष्ट करून घ्यावी लागली.

४. ‘संबंधित पोलीस अधिकारी फरार झाला असल्याचे पोलीस सांगत आहेत. तो अटकपूर्व जामीन मिळून घेईल आणि पोलीस संबंधित अधिकार्‍याला पाठीशी घालतील’, असेही उषा म्हणाल्या.

संपादकीय भूमिका

  • जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक पोलीस !
  • अशा पोलिसांचा भरण असलेले पोलीसदल महिलांचे रक्षण काय करणार ?