जिहादी आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा होत असल्याचा संशय !
पाटलीपुत्र (बिहार) – येथील विमानतळावर काही दिवसांपूर्वी सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून दीड किलो सोने जप्त करण्यात आले होते. या प्रकरणीची चौकशी करण्यात आली असता हे तिघेही मुसलमान असून त्यांतील दोघांनी हितेश आणि अरुण अशी हिंदु नावे धारण केली होती. तसेच तिसर्याचे मुसलमान नाव खरे होते; मात्र त्याने पत्ता चुकीचा सांगितला होता. त्यांची मूळ नावे महंमद अफसर आणि महंमद रिजवान असून तिसर्याने महंमद आरिफ हे खरे नाव सांगितले होते. त्यामुळे हे प्रकरणी जिहादी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करण्याच्या संदर्भात असल्याने पोलीस त्या दृष्टीने अन्वेषण करत आहेत.
हिंदू नाम से प्लेन में हुए सवार, सोने के साथ पकड़े गए: जाँच में निकले सारे मुस्लिम, टेरर फंडिंग की आशंकाhttps://t.co/xGXUGUiC8k
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 16, 2022
१. १० नोव्हेंबर या दिवशी हे तिघे कर्णावती येथून इंडिगो विमानाने पाटलीपुत्र विमानतळावर उतरले होते. त्या वेळी त्यांच्या तपासणीतून त्यांच्याकडे सोने सापडले होते.
२. अधिक चौकशीत त्यांच्याकडे बनावट मतदान ओळखपत्रे होती आणि त्याद्वारे ते प्रवास करत होते, हे निष्पन्न झाले. या तिघांपैकी दोघे देहलीतील, तर एक कर्णावती येथे रहाणारा होता.
३. या तिघांकडे सापडलेले सोने कुणाचे आहे आणि या तस्करीचा प्रमुख कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘ते ज्या विमानातून प्रवास करणार होते, त्या विमानातील त्यांच्या खुर्चीखाली सोने ठेवले असणार’, असे त्यांना सांगण्यात आले होते. हे सोने कुणी आणि कुणाला देण्यासाठी ठेवले होते, याचा शोध घ्यायलचा आहे. दुबईतून आलेले हे सोने कर्णावती येथे कसे पोचले याचाही शोध अन्वेषण यंत्रणा घेत आहेत.
संपादकीय भूमिकाआतापर्यंत लव्ह जिहादसाठीच बहुतांश मुसलमानांकडून अशा प्रकारे हिंदु नावे धारण केली जात होती; मात्र आता तस्करी आणि त्याद्वारे आतंकवादी कारवाया यांसाठीही हिंदु नावे धारण करणे हे मोठे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते ! |