श्री गुरुचरणी जयांचे (पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचे) सदैव अनुसंधान ।

पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांच्या चरणी ८१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी

कार्तिक कृष्ण सप्तमी (१५.११.२०२२) या दिवशी पुणे येथील सनातनच्या ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचा ८१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या कन्येने त्यांची कवितेतून वर्णिलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. ज्योती दाते

प्रारब्धाची जरी असे तीव्रता । त्यावर वरचढ असे सहनशीलता ।
विनम्र, सोशिक अन् त्यागाची मूर्ती । सर्वांवरच असे अपार प्रीती ।। १ ।।

कितीही संकटे जीवनात आली । दृढ श्रद्धेनेच त्यावर मात केली ।
श्री गुरुचरणी जयांचे सदैव अनुसंधान । चित्ती बाणवले अखंड समाधान ।। २ ।।

तयांचे सर्व प्रयत्न श्री गुरूंनी जाणले । मायेतून त्यांना अलगद वर काढले ।
सर्व भय अन् चिंता यांपासून मुक्त केले । संतपदी त्यांना विराजमान केले ।। ३ ।।

त्यांची लेक होण्याचे मज भाग्य लाभले ।
त्यांच्या वाढदिनी कृतज्ञतेचे हे पुष्प अर्पियले ।। ४ ।।

पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी नमस्कार !

– सौ. ज्योती दाते (पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांच्या कन्या, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.११.२०२२)