विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर मुख्याध्यापक म्हणाले, ‘‘किड्यांमध्ये जीवनसत्त्वे असतात, चूपचाप खा !’’

वैशाली (बिहार) येथील सरकारी शाळेत माध्यान्ह भोजनात किडे !  

वैशाली (बिहार) – येथील लालगंज अतातुल्लापूरमधील एका माध्यमिक शाळेत माध्यान्ह भोजनात किडे पडल्याचे लक्षात आल्यावर विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. त्यावर त्या मुख्याध्यपकांनी ‘किड्यांमध्ये जीवनसत्त्वे असतात, चूपचाप खा’, असे उत्तर दिले; मात्र या विद्यार्थ्यांनी माध्यान्ह भोजन ग्रहण करण्यास नकार दिला. त्यामुळे एका शिक्षकाने त्यांना मारहाण केली. ही माहिती शिक्षण विभागाला मिळताच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने शाळेत पोचून या प्रकरणाची चौकशी केली.

संपादकीय भूमिका

अशा मुख्याध्यापकांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !