जे.एन्.यू. विश्वविद्यालयात दोन गटांत हाणामारी

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (‘जे.एन्.यू.’त) दोन गटांत हाणामारी झाली. यानंतर विश्वविद्यालयाच्या परिसरात बाहेरून आलेल्या काही लोकांनी गोंधळ घातला. त्यांच्या हातात काठी आणि हॉकी स्टिक्स होत्या. या झटापटीत २ विद्यार्थी घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आलेली नाही. याविषयी विश्वविद्यालय प्रशासनानेही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

संपादकीय भूमिका

  • वारंवार समाजविघातक घटना घडणार्‍या देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाला सरकार टाळे का ठोकत नाही ?
  • कोट्यवधी रुपयांच्या सरकारी अनुदानातून चालणार्‍या एका विश्वविद्यालयात  विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक बनवण्यात यायला हवे, तेथे सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडतात, याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !