गुरुग्राम येथे गोतस्‍करांच्‍या गाडीचा पाठलाग केल्‍याने त्‍यांनी चालत्‍या गाडीतून फेकल्‍या गायी !

प्रतिकात्मक छायाचित्र

गुरुग्राम (हरियाणा) – येथील गोल्‍फ कोर्स एक्‍स्‍टेंशन मार्गावर गोतस्‍करांच्‍या पिक अप वाहनाचा गोरक्षकांनी पाठलाग केला असता त्‍यांनी गाडीतील गायींना रस्‍त्‍यावर फेकल्‍याची घटना ९ नोव्‍हेंबरच्‍या रात्री घडली. या वेळी गोतस्‍करांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने ती पुढे जाऊन उलटली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्‍थळी आले आणि त्‍यांनी ३ घायाळ गोतस्‍करांना कह्यात घेतले, तर अन्‍य दोघे तेथून पळून गेले. गोतस्‍कर तिघरा गावातून गायींची चोरी करून त्‍यांना नूंह येथे नेऊन कापणार होते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. (जी माहिती गोरक्षकांना मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का मिळत नाही कि ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात? – संपादक)

संपादकीय भूमिका 

गोतस्‍करांना आता फाशीचीच शिक्षा होण्‍यासाठी कायदा करणे आवश्‍यक !