नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामध्ये ६ जणांचा मृत्यू

उत्तर भारतातही जाणवले धक्के

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये झालेल्या ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के देहलीसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवले. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’नुसार या भूकंपाचे केंद्र नेपाळच्या मणीपूर येथे होते. त्याचे मूळ केंद्र हे भूमीच्या खाली १० कि.मी. खोल होते.

(सौजन्य : India Today) 

भारतातील उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, देहली आणि राजस्थान या ५ राज्यांमध्ये भूकंपाचा हादरा बसला. देहलीमध्ये भूकंपानंतर लोक घराबाहेर पडले. भूकंप झाला, तेव्हा लोक गाढ झोपेत होते; पण भूकंपाच्या धक्क्याने ते जागे झाले.