पुणे येथे गायी-म्हशींच्या दूधवाढीसाठी औषधांचा अवैध वापर करणार्‍या पश्चिम बंगालमधील टोळीला अटक !

मुसलमान आरोपीने साथीदारांशी संगनमत करून ओैषधांचा साठा केल्याचे अन्वेषणात उघड

पुणे – गायी-म्हशींच्या दूधवाढीसाठी ‘ऑक्सिटोसीन’ या ओैषधाची निर्मिती, तसेच त्याचे वितरण करणार्‍या पश्चिम बंगालमधील टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक, विमानतळ पोलीस ठाणे, तसेच अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफ्.डी.ए.) संयुक्तरित्या ही कारवाई करत या ओैषधांचा ५३ लाख ५२ सहस्र रुपयांचा साठा जप्त केला आहे. आरोपींनी पुणे शहर, जिल्हा, तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागांतील गोठे मालकांना या ओैषधाची विक्री केल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. समीर कुरेशी याच्यासहित ४ जणांना अटक करण्यात आली असून आरोपी समीर कुरेशीने साथीदारांशी संगनमत करून या ओैषधांचा साठा करून ठेवल्याचे अन्वेषणात उघडकीस झाले आहे. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकारी सुहास सावंत यांनी तक्रार दिली आहे. हे ओैषध ‘इंजेक्शन’मध्ये भरून ते गायी- म्हशींना देण्यात येत असल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.

‘ऑक्सिटोसीन’ औषधामुळे होणारे गंभीर विकार

गायी-म्हशींना हे ओैषध दिल्यानंतर दूध अधिक प्रमाणात येते; मात्र त्याचा परिणाम मानवी शरिरावर होतो. ते दूध प्यायल्यास अशक्तपणा, दृष्टीविकार, पोटाचे आजार, नवजात बालकांना कावीळ, गर्भवती महिलेस रक्तस्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे विकार, तसेच त्वचेचे विकार असे गंभीर विकार होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. ‘ऑक्सिटोसीन’ ओैषध ‘हार्मोन’ आहे. त्याचा वापर तज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रसुती सुरळीत पार पाडण्यासाठी केला जातो, असे एफ्.डी.ए.तील अधिकारी ओैषध निरीक्षक सुहास सावंत यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

प्रत्येक क्षेत्रामध्ये गुन्हेगारीत पुढे असलेले मुसलमान !