जयसिंगपूर येथे मुलांनी साकारली कासा बेटावरील पद्मदुर्ग गडाची प्रतिकृती !

कासा बेटावरील पद्मदुर्ग गडाची प्रतिकृती

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – जयसिंगपूर गल्ली क्रमांक १६ येथील १६ वर्षांखालील मुलांनी कासा बेटावरील पद्मदुर्ग गडाची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती साकारण्यात सर्वश्री रोहित यादव, राजवर्धन पवार, अथर्व यादव, हर्षवर्धन पवार, रुद्र नेमिष्टे यांचा कृतीशील सहभाग आहे. या प्रतिकृतीविषयी समाजातील लोकांकडून मुलांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.