श्रीलंकेच्या नौदलाकडून १५ भारतीय मासेमार्‍यांना अटक

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या सागरी सीमेचे उल्लंघन करून मासेमारी केल्याच्या प्रकरणी श्रीलंकेच्या नौदलाने १५ भारतीय मासेमार्‍यांना अटक केली. त्यांच्या २ स्वयंचलित नौकाही जप्त करण्यात आल्या आहेत. मन्नार बेटाच्या वायव्य किनारपट्टीवर असलेल्या तलाईमन्नार येथे ही कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका

भारतीय मासेमार्‍यांना नेहमीच सागरी सीमेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अशा प्रकारे अटक केली जाते, यासाठी भारत सरकारने या मासेकार्‍यांना भारतीय सीमा लक्षात येण्यासाठी उपाय काढणे आवश्यक आहे !