राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे ही काळाची आवश्यकता ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हडपसर (पुणे) येथील व्याख्यानात धर्मप्रेमींचा ‘हलाल जिहाद’ विरोधात जनजागृती करण्याचा निर्धार

व्याख्यानात डावीकडून श्री. दीपक आगवणे, श्री. पराग गोखले आणि बोलतांना श्री. सुनील घनवट

हडपसर (जिल्हा पुणे), १ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘हलाल जिहाद’ ही राष्ट्रासमोरील भयंकर समस्या असून हलाल जिहादच्या माध्यमातून राष्ट्रविघातक शक्तींनी स्वतःची वेगळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे आणि भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र राबवले जात आहे. या देशात हिंदू बहुसंख्य असून हिंदूंनी घटनात्मक मार्गाने याला विरोध करायला हवा. तसेच राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाच्या अंतर्गत पुणे येथे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत पुणे येथील राधाकृष्ण मंदिर येथे ‘हलालमुक्त दिवाळी आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर नुकतेच एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या व्याख्यानाचे आयोजन स्थानिक धर्मप्रेमींनी केले होते. या वेळी धर्मप्रेमींनी हलाल जिहादच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा निर्धार केला.

व्याख्यानाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

वैशिष्ट्यपूर्ण

१. या वेळी श्री. धनंजय कामटे, अध्यक्ष, मध्य हवेली, भाजप, तसेच भाजपचे नगरसेवक श्री. मारुति आबा तुपे, हिंदवी स्वराज्य युवा संघटना, हडपसरचे संस्थापक/अध्यक्ष श्री. अभिजित बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते. हलाल जिहादचा निषेध म्हणून घोषणा देत सर्वांनी ‘व्हिडिओ बाईट’सुद्धा दिल्या आणि ‘सामाजिक माध्यमांतून जागृती करणार’, असे सांगितले.

२. ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य कौतुकास्पद आहे’, असे राधाकृष्ण मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री. जगताप सर यांनी सांगितले.

३. मंदिराच्या व्यवस्थापक श्रीमती सुभद्रा जगताप म्हणाल्या की, आमचे मंदिर हे समितीच्या कार्यक्रमांसाठी सदैव उपलब्ध करून देऊ म्हणजे आम्हालाही राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात सहभाग घेता येईल.

४. धर्मप्रेमी श्री. रवी घुले यांनी हलाल जिहादच्या संदर्भातील माहितीचे सनातन संस्था निर्मित ५० ग्रंथ घेऊन धर्मप्रेमींना वाटले. ‘समितीच्या माध्यमातून धर्मशिक्षणवर्ग चालू करावा. म्हणजे आम्हाला मार्गदर्शन मिळेल’, अशी मागणी धर्मप्रेमींनी केली.