कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची नाहक चौकशी !

नुकतीच एका शहरातील पोलीस ठाण्यातील पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याची दूरभाषवरून चौकशी केली. या वेळी त्यांच्यामध्ये पुढील संभाषण झाले.

पोलीस : तुमचे एका भागात आंदोलन झाले ना ? नवरात्रोत्सवात तुम्ही कुठल्या मंडळांना भेट द्यायला जाणार आहात का ?
कार्यकर्ता : तुम्ही असे का विचारत आहात ?

पोलीस : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न येतो.
कार्यकर्ता : आम्ही सर्व आंदोलने पोलिसांची अनुमती घेऊनच करतो.

पोलीस : तुम्ही कुठल्या मंडळांना भेटी देणार आहात ? तिथे जाण्यापूर्वी आम्हाला कळवा; कारण कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न येतो.
कार्यकर्ता : कोणत्या मंडळांना भेटी द्यायचे, हे अजून ठरलेले नाही.

संपादकीय भूमिका

हिंदु जनजागृती समितीचे प्रत्येक आंदोलन पोलिसांची अनुमती घेऊन वैध मार्गाने केले जात असतांना कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली समितीच्या कार्यकर्त्यांची नाहक चौकशी करणार्‍या पोलिसांचा हा हिंदुद्वेष नव्हे का ?