पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे यांची मधली सून सौ. शैला राजेंद्र इंगळे यांनी व्यक्त केलेले मनोगत !

दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांच्या देहत्यागाला आज १ मास होत आहे. त्या निमित्ताने…

पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे

परम पूज्यांच्या चरणी वंदन

१. पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सौ. शैला राजेंद्र इंगळे

१ अ. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केल्यावर जीवनात पालट होणे

माझे सासरे पू. चत्तरसिंग इंगळे सनातन संस्थेशी जोडले गेले आणि त्यांचे जीवनच पालटून गेले. त्यांच्या जीवनाकडे पहाण्याच्या दृष्टीकोनात पालट झाला. ‘ते सतत साधना करत असल्यामुळे त्यांच्यात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले’, असे मला जाणवले. ते ‘सनातन संस्थेचे १८ वे संत’ म्हणून ओळखले जात होते.

१ आ. ते नेहमी आम्हाला सन्मार्गाने जाण्याचा उपदेश करायचे. ते नेहमी आम्हाला साधना करण्यासाठी प्रेरित करत असत.

२. साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. साधकांच्या तोंडवळ्यावर चैतन्य जाणवणे : आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. त्या वेळी मला जाणवले, ‘येथील सर्वच साधक आणि साधिका यांच्या तोंडवळ्यावर एक वेगळेच चैतन्य आहे.’ त्यांच्याकडे पाहून मला प्रसन्न वाटले.

२ आ. साधकांची सेवाभावी वृत्ती : माझ्या सासर्‍यांची येथील साधकांनी (श्री. विजय लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि श्री. विजय बेंद्रे यांनी) पुष्कळच प्रेमाने आणि तन्मयतेने सेवा केली. आम्ही कुटुंबीय सर्व साधकांचे ऋणी आहोत.

– सौ. शैला राजेंद्र इंगळे (पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे आजोबांची मधली सून), दुर्ग, छत्तीसगड. (९.१०.२०२२)