समस्तीपूर (बिहार) येथे मौलानासह मुसलमानांनी दलित तरुणाला ५ वेळा थुंकी चाटायला लावली !

दलित तरुणावर छेडछाड केल्याचा आरोप

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

समस्तीपूर (बिहार) – येथील विभूतीपूरमध्ये एका मौलानाने शेकडो मुसलमानांसमोर एका दलित हिंदु व्यक्तीला छेडछाडीच्या प्रकरणी ५ वेळा थुंकी चाटायला लावल्याची घटना समोर आली आहे. त्यापूर्वी त्याला मारहाणही करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ही घटना १९ ऑक्टोबरची आहे. ‘राज्यातील नितीश कुमार सरकारने मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी जाणीवपूर्वक ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप भाजपने केला आहे.

भाजप प्रवक्ते रामसागर सिंह यांनी म्हटले की, मुख्यमंत्री नितीश कुमार हे नामधारी असून खरी सत्ता हे बिहारचे मुख्य सचिव अमीर सुबहानी जालवत हे चालवत आहेत. हेच अमीर सुबहानी हे आतंकवाद्यांना बिहारमध्ये आश्रय देण्याचे आणि बिहारला आतंकवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनवण्याचे काम करत आहेत, असा आरोपही सिंह यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

दलित-मुसलमान भाई भाई म्हणणारे आता कुठे आहेत ? या ठिकाणी सवर्ण हिंदू असते, तर एव्हाना संपूर्ण देशातून ढोंगी पुरो(अधो)गामी एकजात हिंदूंवर तुटून पडले असते; मात्र आता अत्याचार करणारे मुसलमान असल्याने ते गप्प आहेत, हे लक्षात घ्या !