हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने…
‘हिंदु जनजागृती समितीची स्थापना ७ ऑक्टोबर २००२ या दिवशी झाली. हिंदु जनजागृती समितीने गेली २० वर्षे ऐतिहासिकरित्या केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याची वेळ आता आली आहे. समितीचे कार्य मी जवळून पाहिले असून तिचे कार्य हिंदु धर्मीय आणि हिंदु राष्ट्र यांसाठी आहे. समिती धर्म आणि राष्ट्र यांसाठी कटीबद्ध असल्याने मला त्या कार्यात सहभागी व्हावेसे वाटले. त्यांनी म्हापसा (गोवा) येथे श्री बोडगेश्वरदेवाच्या प्रांगणात घेतलेल्या प्रथम सभेला मी उपस्थित होतो. त्या सभेचा मी साक्षीदार आहे.
१. भगवान श्रीकृष्णाच्या इच्छेप्रमाणे भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अखंड प्रयत्नरत असणे
‘हिंदु’ या शब्दाची उत्पत्ती वेदातील ‘सिंधु’ या शब्दापासून झाली आहे. ‘हिंदु’ हे सनातन धर्माचेच नाव आहे. प्राचीन काळापासून या देशातील लोक हिंदु आहेत. त्यामुळे हा भूप्रदेश हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो. ख्रिस्ती आणि इस्लाम पंथांच्या उगमापूर्वीपासून हिंदु धर्म आहे. हे पंथ केवळ अनुक्रमे २ सहस्र आणि १ सहस्र ४०० वर्षांपूर्वीच स्थापन झालेले आहेत. भारत ही आध्यात्मिक भूमी आहे. राष्ट्रीय नदी गंगा आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आध्यात्मिक, सांस्कृतिक अन् वैदिक वारसा आपल्या देशाला लाभला आहे. ‘अजरामर क्रांतीकारकांचा आणि शौर्यगाथेने नटलेला हा भारत देश पुनःश्च हिंदु राष्ट्र व्हावे’, अशी भगवान श्रीकृष्णाची इच्छा आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती अखंड प्रयत्नरत आहे.
२. हिंदु जनजागृती समितीने महिलांच्या रक्षणासाठी केलेले उल्लेखनीय कार्य
हिंदूंच्या या देशाला मुसलमान ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून, तर ख्रिस्ती धर्मांतराच्या माध्यमातून पोखरत आहेत. याची प्रथम जागृती करून देणारे कोण असेल, तर ती हिंदु जनजागृती समिती आहे ! हिंदूंवर होणारा अन्याय आणि अत्याचार यांच्याविरुद्ध व्यापक स्तरावर जागृती करण्याचे महत्कार्य ही संघटना करते. समिती हिंदु महिलांवर होणारे अत्याचार आणि ‘लव्ह जिहाद’ यांविषयी जनजागृती करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे अशा अनेकविध ठिकाणी विषय मांडून महिलांना सतर्क करण्याचे काम करते. हिंदु महिलांना आत्मरक्षण करण्यासाठी रणरागिणी बनवते आणि त्यांचे आत्मबळ वाढवते.
३. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना आत्मबलसंपन्न करण्याचे कार्य करणे
बांधवांनो, ख्रिस्त्यांना चर्चमधून, तर मुसलमानांना मशिदी आणि मदरसे येथे धर्मशिक्षण मिळते. हिंदूंना कोणत्याच माध्यमातून धर्मशिक्षण मिळत नाही. अशा स्थितीत ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली, त्याप्रमाणे हिंदु जनजागृती समिती सर्व हिंदूंना धर्मशिक्षित करत आहे. यासाठी समिती अनेक ठिकाणी साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक धर्मशिक्षण वर्ग अन् बालसंस्कार वर्ग चालवते. समितीने दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातूनही घरोघरी धर्मशिक्षण पोचवले आहे. या माध्यमातून आतापर्यंत ८० लाख हिंदूंनी लाभ घेतला आहे. ब्रिटिशांनी भारतीय गुरुकुल शिक्षणपद्धत संपवली; पण हिंदु जनजागृती समिती ती परत रुजवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.
४. सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजऋण फेडणे
हिंदु जनजागृती समिती धर्मकार्य करतांनाच मंदिर स्वच्छता, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण मोहीम, पूरग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना साहाय्य करणे, गरजूंना खाऊ आणि कपडे यांचे वाटप करणे अशा सामाजिक कार्यातही समिती तिचा वाटा उचलते.
५. धर्मरक्षणाचे कार्य करतांना समितीने अन्य संघटनांसमोर आदर्श निर्माण करणे
समिती फलकप्रसिद्धी आणि धर्मसभा यांच्या माध्यमातून धर्मरक्षण अन् हिंदूसंघटन करते, तसेच नाटके, चित्रपट, विज्ञापने, टी-शर्ट अशा विविध माध्यमांतून होणारे देवतांचे विडंबन थांबवण्यासाठी कार्य सतत चालू असते. हिंदु मंदिरांवर होणार्या आघातांच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती सतत आवाज उठवते. मंदिरांमध्ये होणार्या चोर्या आणि मूर्तींची तोडफोड यांच्याविरुद्ध समिती सतत आवाज उठवत आहे. समितीने ‘सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील निधीचा विनियोग कसा होतो ?’ याचे पुरावे गोळा केले. सरकारीकरण झालेल्या मंदिरांचा निधी धर्मांधांच्या हज यात्रेसाठी आणि त्यांच्या मदरशांना अनुदान देण्यासाठी वापरण्यात येतो, हे ऐकून सर्वप्रथम मलाही धक्काच बसला होता. ही गोष्टही समितीमुळेच समाजाला समजली आहे.
विविध राज्यांमध्ये सरकारने रस्ता रुंदीकरण करण्याच्या नावाखाली अनेक मंदिरे पाडली. समितीने या विरोधात चळवळ राबवून आवाज उठवला. इतर धर्मीय आणि सरकार हिंदु मंदिरे अन् संस्कृती यांवर करत असलेल्या आघातांविषयी समितीने वाचा फोडली आहे. मंदिरातील उत्सवांत होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी समितीचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात देवतेच्या मूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात का करावे ? याविषयी जागृतीही समिती करते. पुरो(अधो)गामी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात हिंदूंचे सण आणि उत्सव यांवर प्रतिबंध आणू पहात होते; पण समितीने केलेल्या विरोधामुळे त्यांचा प्रयत्न सर्वतोपरी फसला.
‘व्हॅलेंटाईन डे’, ‘फ्रेंडशिप डे’ असे अनेक प्रकारचे पाश्चात्त्य ‘डे’ हिंदु युवक-युवती साजरे करतात. त्याचा गंभीर परिणाम त्यांनाच भोगावा लागतो. याविषयी समितीने व्यापक जनजागृती केली आहे. ३१ डिसेंबर, होळी, नरकासुर अशा दिवशी होणार्या अपप्रकांना आळा घालण्यासाठी समिती सदैव तत्पर असते.
६. राष्ट्रविरोधी गोष्टींना विरोध करून राष्ट्ररक्षण करणे
भारताचे राष्ट्र्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा अवमान होऊ नये, यासाठी समिती जागृती करते. समिती थोर स्वातंत्र्यसैनिकांची जयंती-पुण्यतिथी साजरी करते आणि समाजाला त्यांची आठवण करून देते. ‘एन्.सी.ई.आर.टी.’ या शैक्षणिक पाठ्यपुस्तकात राष्ट्र्रपुरुषांच्या अवमानाविरुद्ध समितीने आवाज उठवला. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ५ ओळी होता. त्यावरून त्याचा एक धडा करण्यास समितीने सरकारला भाग पाडले. या आंदोलनात मीही सक्रीय सहभागी झालो होतो. याचा मला आनंद आहे.
७. धर्मांधांच्या विविधजिहादांच्या विरोधात लढा देणे
राष्ट्रावरील मोठे संकट, म्हणजे मुसलमानांची वाढती लोकसंख्या. त्यांच्या धार्मिक स्थळांमधून भारताला इस्लामी राष्ट्र घोषित करण्यासाठी विविध प्रकारचे जिहाद करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ‘लव्ह जिहाद’विषयी सर्वप्रथम समितीने जागृती केली, तेव्हा अनेकांनी समितीची चेष्टा केली होती. आता पाणी नाकातोंडात गेल्यानंतर लोकांचे डोळे उघडले आहेत. अशा विविध प्रकारच्या जिहादांविषयी समिती जागृती करते. ‘हलाल जिहाद’ हाही त्यातील एक भयंकर जिहाद आहे. त्याने भारताच्या आर्थिक व्यवस्थेला मोठा धोका निर्माण केला आहे. त्याविषयीही समिती जनजागृती करते.
८. हिंदूंनो, हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्यात तन, मन आणि धन यांद्वारे सहभागी व्हा !
हिंदु जनजागृती समिती झोपलेल्या हिंदूंना जागे करण्याचे महत्कार्य करत आहे. आतातरी आपण जागे होऊया. ‘न पेक्षा झोपल्या ठिकाणी कधी नष्ट पोचू’, हे सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे. अशा या हिंदूंना जागे करणार्या हिंदु जनजागृती समितीला माझे त्रिवार दंडवत ! हिंदु जनजागृती समितीचा द्विदशकपूर्ती वर्धापनदिनाचा कार्यक्रम १६ ऑक्टोबर या दिवशी होत आहे. त्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा आणि कोटी कोटी प्रणाम !
हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या या दैवी कार्यात सर्व हिंदूंनी सहभागी होऊया. ज्याप्रमाणे रामसेतू बांधण्याच्या कार्यात खारीने स्वतःचा वाटा उचलला, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आणि गोप-गोपींनी त्यास काठी लावून त्यांचे धर्मकर्तव्य बजावले, त्याचप्रमाणे सर्व हिंदु बांधवांना मी आवाहन करतो की, सर्वांनी या कार्यात सहभागी होणे, ही काळाची आवश्यकता आहे. ‘धर्म टिकला, तर राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र टिकले, तर आम्ही टिकू.’ यासाठी ‘एकच ध्येय, एकच लक्ष्य आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र !!!’
– श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, म्हापसा, गोवा. (१२.१०.२०२२)