निर्मात्यांकडून ‘चित्रगुप्त’ आणि ‘यमदूत’ यांच्या नावांत पालट !

  • ‘थँक गॉड’ चित्रपटाला झालेल्या वाढत्या विरोधाचा परिणाम !

  • कायस्थ समाजाकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी

मुंबई – ‘थँक गॉड’ या चित्रपटाला विरोध वाढत असल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यातील ‘चित्रगुप्ता’चे नाव पालटून ‘सीजी’ आणि ‘यमदूता’चे नाव पालटून ‘वायडी’ केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील आशय सारांशरूपाने दाखवणारा व्हिडिओ) प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या ३ दिवस आधी निर्मात्यांनी वरील निर्णय घेतला आहे.

१. चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये चित्रगुप्ताच्या भूमिकेतील अभिनेते अजय देवगण यांना ‘फॅन्सी’ कपड्यांमध्ये दाखवण्यात आले आहे. या दृश्यांविषयी भगवान चित्रगुप्ताची पूजा करणार्‍या कायस्थ समाजाने तीव्र आक्षेप नोंदवला. कायस्थ समाजाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

२. चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या प्रकरणावर लवकरच सुनावणी करण्याची मागणीही करण्यात आली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर या दिवशी आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या विरोधात प्रत्येक वेळी अशा प्रकारे संघटित होऊन विरोध करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !