अंबरनाथ येथे वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणार्‍या २० रिक्शा जप्त !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – अंबरनाथ शहरात पोलीस अवैध आणि नियम मोडणार्‍या रिक्शाचालकांच्या विरोधात कारवाई करत आहेत. वाहतूक पोलिसांनी ३०० हून अधिक रिक्शांचे अन्वेषण करत विनापरवाना, गणवेश परिधान न करणारे, थांबा सोडून इतरत्र रिक्शा उभी करत वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे चालक यांच्या २० रिक्शा जप्त केल्या आहेत.