हिंदु तरुणीशी विवाह करून तिला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या महंमदच्या विरोधात गुन्हा नोंद !

  • बेगूसराय (बिहार) येथे लव्ह जिहाद !

  • फेसबुकवरून मैत्री करून ओढले होते प्रेमाच्या जाळ्यात !

बेगूसराय (बिहार) – येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह करणार्‍या, तिला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडणार्‍या आणि तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करणार्‍या महंमद आफताब आलम नावाच्या धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडितेने त्याच्या विरोधात तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार युवती समस्तीपूर येथील रहाणारी असून ती बेगूसराय येथे एका कपड्याच्या दुकानात काम करत होती. फेसबुकवरून तिची महंमदशी मैत्री झाली. महंमदने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती २ वेळा गरोदर राहिली, तेव्हा त्याने तिला बलपूर्वक गर्भपात करण्यास भाग पाडले. पुढे दोघांनी विवाह केला. कालांतराने महंमदने तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव बनवल्याने तिने इस्लामही स्वीकारला. पुढे तिला पुन्हा दिवस राहिल्यावर तिने गर्भपातास विरोध केला. तेव्हा त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तो फरार झाला. युवतीने तिच्या माहेरी याविषयी सांगून साहाय्य मागितले, परंतु तिने विरोधात जाऊन विवाह केल्याने त्यांनी तिला साहाय्य करण्यास नाकारले. शेवटी बेगूसराय येथील महिला पोलीस ठाण्यात तिची तक्रार प्रविष्ट करून घेण्यात आल्यावर पोलीस अधीक्षकांच्या साहाय्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • बिहारमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा नसल्याने या तरुणीला न्याय मिळणे अशक्यप्राय आहे. यासाठी आता केंद्र सरकारनेच संपूर्ण देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा करून अशा प्रकरणांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
  • हिंदु तरुणींमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच त्या धर्मांध मुसलमानांच्या जाळ्यात ओढल्या जातात, हे लक्षात घ्या !