(म्हणे) ‘काफिरांनो, आमची वेळ आली की तुम्हाला गाडून टाकू !’

  • अरशद नावाच्या धर्मांध मुसलमानाचा चिथावणी देणारा व्हिडिओ प्रसारित !

  • मेरठ (उत्तरप्रदेश) येथील शिवलिंगावर लघवी करणार्‍या शोएबचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अटक !

  • इस्कॉनच्या प्रवक्त्याने ट्वीट केले व्हिडिओ !

कोलकाता – मुस्तफा अरशद खान नावाच्या एका धर्मांध मुसलमानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. यामध्ये तो हिंदूंना ‘काफीर’ म्हणत धमकावत आहे की, जेव्हा वेळ येईल, तेव्हा आम्ही सर्व हिंदूंचे नाव गाडून टाकू ! हा व्हिडिओ इस्कॉनचे कोलकाता येथे वास्तव्यास असणारे प्रवक्ते राधारमण दास यांनी ट्वीट केला आहे. यामध्ये दास म्हणतात, ‘‘मुसलमान संपूर्णपणे आश्‍वस्त आहेत. त्यांना हे व्यवस्थित ठाऊक आहे की, जेव्हा त्यांची वेळ येईल, तेव्हा त्यांना काय करायचे आहे ? हिंदूंनो, तुम्ही काय करणार आहात ?’’ मुस्तफा अरशद खान याचे इन्स्टाग्रामवर १४ सहस्रांहून अधिक अनुयायी आहेत, अशी माहितीही दास यांनी ट्वीटमध्ये दिली आहे.

१. दास यांनी अन्य एक व्हिडिओही ट्वीट केला आहे. तोही मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यामध्ये शोएब नावाचा मुसलमान शिवलिंगावर लघवी करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील रासना गावातील आहे. ही घटना १८ ऑक्टोबरची असून मंदिराचे पुजारी सकाळी मंदिरात आले असता त्यांना मंदिराचे फाटक उघडे असल्याचे आढळले. तसेच मंदिरामध्ये पुष्कळ दुर्गंधी पसरल्याचे लक्षात आले. यानंतर मंदिरात लावलेल्या ‘सीसीटीव्ही’चे ‘फूटेज’ तपासण्यात आले. तेव्हा वरील प्रकार समोर आला. या घटनेवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी शोएबला अटक केली आहे. शोएब हा मद्यपी असून मद्य पिल्यावर त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. (जर असे असेल, तर त्याने मशीद अथवा चर्च येथे जाऊन अशा प्रकारे अश्‍लाघ्य वर्तन का केले नाही, याचे उत्तर पोलीस देतील का ? – संपादक)

२. राधारमण दास यांनी या व्हिडिओसमवेत लिहिले आहे की, शोएबने शिवलिंगावर लघवी केली. आज हिंदूंची स्थिती अशी आहे  की, ते यावर काहीच करणार नाहीत !

३. शिवलिंगावर अशा प्रकारे लघवी करण्याच्या संतापजनक घटना याआधीही घडल्या आहेत. मार्च २०२१ मध्ये आसिफ नावाच्या धर्मांध मुसलमानाने शिवलिंगावर लघवी केली होती. असाच प्रकार जुलै २०१९ मध्ये इरशाद उपाख्य ईरानी नावाच्या मुसलमानाने उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील जहांगीरबाद येथे असलेल्या महादेव मंदिरात केला होता.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचा कथित अनादर झाल्यावर देशभरातील धर्मांध मुसलमान ‘सर तन से जुदा’ची आरोळी ठोकत हिंदूंना ठार करतात. दुसरीकडे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर ते निषेधाचा एक शब्दही तोंडातून काढत नाहीत. यामुळेच अशा घटना प्रतिदिन सर्वत्र घडत रहातात, यात काय आश्‍चर्य ?
  • अशा घटनांवर निधर्मीवादी चकार शब्दही काढत नाहीत, न कोणती प्रसारमाध्यमे बातमी प्रसारित करतात !