अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी दगड मारण्याची शिक्षा देण्यापूर्वीच भीतीपोटी महिलेची आत्महत्या !

विवाहित पुरुषासमवेत पळून जाऊन लग्न करण्याचा केला होता प्रयत्न !

प्रतिकात्मक चित्र

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आल्यापासून महिलांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यांना शिक्षणापासूनही वंचित ठेवण्यात आले आहे. तालिबान्यांकडून महिलांना सार्वजनिक ठिकाणी दगड किंवा चाबूक मारण्याच्या शिक्षाही दिल्या जात आहेत. ‘तालिबानी भरचौकात दगड मारण्याची शिक्षा देतील’, या भीतीपोटी एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. भोर प्रांतात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या महिलेने एका विवाहित पुरुषासमवेत पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तालिबानी सैनिकांनी महिलेवर सार्वजनिक ठिकाणी दगड मारण्याची शिक्षा सुनावली होती; मात्र त्यापूर्वीच अपमानाच्या भीतीने महिलेने गळफास लावून आत्महत्या केली.

संपादकीय भूमिका

भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !