महंमद अक्रम याने हिंदु बनून हिंदु महिलेवर केला बलात्कार

मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघड !

भोपाळ – मध्यप्रदेशच्या राजधानीमध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक प्रकरण समोर आले आहे. महंमद अक्रम नावाच्या मुसलमानाने ‘अमर कुशवाहा असल्याचे भासवून एका हिंदु महिलेवर बलात्कार केला. नंतर त्या धर्मांधाने तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले. ‘अक्रमचा शोध चालू आहे’, असे भोपाळ पोलिसांनी सांगितले.

१. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा पती दुसर्‍या राज्यात काम करतो. सुमारे २ मासांपूर्वी पीडित महिलेची आरोपीशी भ्रमणभाषवर ओळख झाली; मात्र यानंतर अक्रमने स्वत:ला अमर कुशवाह असल्याचे सांगून तिच्याशी संपर्क ठेवणे चालू केले.

२. अक्रमने तिला विश्‍वासात घेण्यासाठी त्याचे टिळा लावलेले एक छायाचित्र पाठवले. दोघांमध्ये बोलणे चालू झाले. १६ ऑक्टोबर २०२२ या दिवशी अक्रमने पीडितेला भेटायला बोलावून भोपाळमधील एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला.

३. हॉटेलमध्ये तिला अमरची अक्रम असल्याविषयी माहिती मिळाली. अक्रमने पीडितेवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. पीडितेवर नमाजपठणासाठीही दबाव टाकण्यात आला.

४. अक्रमच्या तावडीतून सुटून पीडित महिलेने एम्.पी. नगर पोलीस ठाणे गाठले आणि अक्रमच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अक्रमच्या विरोधात गुन्हा नोंदवला. या घटनेनंतर अक्रम फरार झाला आहे.

संपादकीय भूमिका

अशा लव्ह जिहाद्यांच्या विरोधात तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !