सांगली – येथील ‘जिवा महाले’ पुरस्कार मिळालेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रवीण कवठेकर (वय ६० वर्षे) यांचे १४ ऑक्टोबरला रुग्णाईत असल्याने विवेकानंद रुग्णालयात दुपारी ३ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांनी एक दिनदर्शिका प्रकाशित केली होती. त्यावर अफझलखानवधाचे चित्र छापून ‘दहशतवाद असाच संपवावा लागतो’, अशी ओळ प्रसिद्ध केली. या संदर्भात त्यांना कारागृहवासही पत्कारावा लागला होता. यानंतरही त्यांनी हिंदुत्वाचे कार्य एकांड्या शिलेदाराप्रमाणे अनेक वर्षे चालूच ठेवले होते.
हिंदुत्वाचा प्रसार-प्रचार करण्यासाठी ते मासिक ‘लोकजागर’ चालवत होते. हिंदु जनजागृती समितीविषयी आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्याविषयी त्यांना विशेष आपुलकी होती, तसेच ते काही आंदोलनांनाही उपस्थित रहात.