रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

श्रीमती शीला करंडे

१. ‘एकदा मी रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा मला पुष्कळ आनंद आणि चैतन्य मिळाले.

२. एकदा मी परात्पर गुरुदेवांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले होते. एक दिवस फलकावरील सूत्र वाचतांना मला त्या अक्षरांतून त्यांचा चैतन्यमय आवाज ऐकू आला. त्या वेळी माझे अंतःकरण आणि डोळे भरून आले.

३. सेवा करतांनाही मला चैतन्य आणि आनंद जाणवत होता.

४. ‘परात्पर गुरुदेव माझ्यासमोर आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी ‘खरोखर वैकुंठातील आनंद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’, हे ठामपणे माझ्या अंतर्मनात रुजले.’

– श्रीमती शीला करंडे (आताची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६३ वर्षे), वणी, जिल्हा यवतमाळ. (४.१०.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक