सार्वजनिक ठिकाण अस्वच्छ करणार्यांकडून ८४ सहस्र रुपयांचा दंड वसूल !
नागपूर – महानगरपालिकेने नुकतेच सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे, तसेच कचरा फेकणार्यांवर कारवाई चालू केली आहे. आता पुढच्या टप्प्यात शौचासाठी पाळीव श्वानांना रस्त्यांवर घेऊन येणार्या श्वानमालकांवर दंड आकारण्याची सिद्धता महानगरपालिकेने केली आहे. श्वान मालकांकडून पुढील मासांपासून दंड आकारणी केली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने ११ ऑक्टोबर या एका दिवसातच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणार्यांकडून ८४ सहस्र ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कचरा टाकणार्यांकडून ३१ सहस्र २०० रुपयांचा दंड वसूल !महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या कर्मचार्यांनी रस्ता, पदपाथ आणि मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्या ७८ जणांकडून ३१ सहस्र २०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्वांवर प्रत्येकी ४०० रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. रस्ता, पदपथ, मोकळ्या जागेवर ठिकाणी कचरा टाकणार्या ५३ जणांकडून प्रत्येकी १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. शैक्षणिक संस्था आणि खासगी शिकवणी यांच्याविरुद्ध आशीनगर विभागात एका प्रकरणाची नोंद करण्यात आली असून १ सहस्र रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उपद्रव करणार्या संस्थांकडून २३ प्रकरणांमध्ये २३ सहस्त्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. |
संपादकीय भूमिका‘रस्त्यावर कचरा टाकू नये’, असे सांगावे लागते, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |