वामन मेश्राम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा ! – अधिवक्ता भगवान लोणारे यांची मागणी

वामन मेश्राम

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाची राज्यघटना पालटण्याचा प्रयत्न करत असल्याचा कांगावा करून देशातील भोळ्या-भाबड्या आंबेडकरी जनतेची दिशाभूल करणारे भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी अधिवक्ता भगवान लोणारे यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी येथे केली आहे.

अधिवक्ता भगवान लोणारे म्हणाले की, वामन मेश्राम यांचे वक्तव्य पूर्णपणे तथ्यहीन आणि चुकीचे आहे. आपल्या देशाच्या राज्यघटनेत संशोधन होऊ शकते; मात्र त्यात पालट होऊ शकत नाही. ही वस्तूस्थिती असतांनाही वामन मेश्राम संघ राज्यघटना पालटणार असल्याची खोटी बतावणी करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायमूर्तींनी आपल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्पष्ट केले आहे की, राज्यघटनेच्या मूलभूत माहितीत कुठलाही पालट होऊ शकत नाही. असे असतांनाही वामन मेश्राम संघ राज्यघटना पालटणार असल्याचा भ्रामक प्रचार करतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात यावा.