कुठे ५ रुपयांची बचत होत असल्यावरून वेतन न्यून करण्यास सांगणारे लालबहादूर शास्त्री आणि कुठे सहस्रो रुपये वेतन घेणारे काँग्रेसचे आजचे लोकप्रतिनिधी !

लालबहादूर शास्त्री

‘लालबहादूर शास्त्री काँग्रेसचे सरचिटणीस असतांना त्यांना प्रतिमास ६० रुपये वेतन होते, जे ते आपल्या पत्नीकडे देत. त्यामध्ये त्यांचा सगळा व्यय (खर्च) चालत असे. एकदा त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्याकडे आला. त्याच्या मुलाच्या शस्त्रकर्मासाठी त्याला ६० रुपये उसने पाहिजे होते. त्यांनी शास्त्रीजींकडे ६० रुपये मागितले. शास्त्रीजी म्हणाले, ‘‘माझे वेतनच तेवढे आहे, ज्यामध्ये माझ्या कुटुंबाचा खर्च जेमतेम भागतो. मी तुला कुठून पैसे देऊ ?’’ शास्त्रीजींची पत्नी हे ऐकत होती. त्या म्हणाल्या, ‘‘त्यांची आजची निकड महत्त्वाची आहे. माझ्याकडे ६० रुपये आहेत. आपण ते त्यांना द्या.’’ शास्त्रीजींनी त्याला पैसे दिले.

तो मित्र गेल्यावर शास्त्रींनी आपल्या पत्नीला विचारले, ‘‘हे पैसे तू कुठून आणलेस ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्या प्रतिमासातील वेतनातून मी ५ रुपये साठवत होते. त्याचे १ वर्षाचे असे साठलेले ६० रुपये माझ्याकडे होते.’’ त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आणि ‘स्वतःचे वेतन ५५ रुपये करण्याची विनंती केली.’ त्यांनी असे लिहिले की, माझा प्रतिमासाचा व्यय ५५ रुपयांत भागतो !’

(साभार: सामाजिक माध्यम)