साधकांनी कर्तेपणा दूर सारून संपूर्ण शरणागतभावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यास साधकांचे रक्षण होणार असणे

भगवंत त्याची मारक शक्ती श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपातून प्रगट करत असल्याने साधकांनी कर्तेपणा दूर सारून संपूर्ण शरणागतभावाने त्यांना प्रार्थना केल्यास साधकांचे रक्षण होणार असणे

‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका वर्षीच्या ‘विजयादशमी विशेषांका’मध्ये श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी लिहिलेला एक लेख प्रसिद्ध झाला होता. ‘भगवंताची तारक आणि मारक अशी दोन रूपे असून भगवंताच्या मारक रूपाला सामोरे जाण्यासाठी केवळ ‘शरणागती अन् प्रार्थना’ हा एकच उपाय असणे’, हा त्यांचा लेख वाचल्यावर माझी पुढील विचारप्रक्रिया झाली.

श्री. संजोग टिळक

१. भगवंताच्या मारक रूपाची दाहकता

भगवंताचे मारक रूप दुर्जनांचा नाश करण्यासाठी असले, तरी त्याच्या दाहकतेमुळे साधकांनाही त्याची झळ पोचू शकते. भगवंताने आपले मारक स्वरूप थोडे जरी प्रगट केले, तरी भगवंताच्या इच्छेविरुद्ध ते सहन करणे कोणालाही शक्य नसते.

२. भगवंत त्याची मारक शक्ती श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाद्वारे प्रगट करत आहे.

३. द्वापर युगामध्ये अश्वत्थाम्याने कुरुक्षेत्रात पांडवांवर महाभयंकर नारायणास्त्र सोडणे, त्या वेळी श्रीकृष्णाने पांडवांसह सर्व सेनेला नारायणास्त्राला शरण जाऊन प्रार्थना करण्यास सांगणे आणि त्यामुळे सर्वांचे रक्षण होणे

द्वापर युगामध्ये कौरव आणि पांडव यांच्या कुरुक्षेत्रातील युद्धप्रसंगी अश्वत्थाम्याने महाभयंकर अशा नारायणस्त्राचा वापर पांडवांवर केला होता. त्या वेळी श्रीकृष्णाने पांडवांसह सर्व सेनेला शस्त्र खाली ठेवून, रथातून भूमीवर उतरून त्या नारायण अस्त्रासमोर हात जोडून शरण जायला आणि त्या शस्त्रालाच रक्षणासाठी प्रार्थना करायला सांगितले. महाबली भीमाने याला नकार दिला. तेव्हा ते महाविनाशकारी नारायणास्त्र भीमाचा वध करणार होते; पण श्रीकृष्णाच्या कृपेने भीमाला सुबुद्धी झाली आणि त्याने श्रीकृष्णाचे आज्ञापालन करून स्वतःचे रक्षण केले. तेव्हा नारायणस्त्राचा कोप शांत झाला आणि सर्वांचे रक्षण झाले.

४. नारायणास्त्रापासून रक्षण होण्याचा मार्ग !

आता जे नारायणास्त्र मारक स्वरूपात प्रगट होत आहे (भगवंताची मारक शक्ती तीव्र होत आहे), ते साधकांच्या रक्षणासाठी असले, तरी साधकांनी आपापली शस्त्रे खाली ठेवून (कर्तेपणा दूर सारून) रथातून खाली भूमीवर उतरून (भौतिक साधनांवर विसंबून न रहाता संत आणि सद्गुरु यांचे आज्ञापालन करून) हात जोडून आणि नतमस्तक होऊन (संपूर्ण शरण जाऊन) त्या मारक रूपातील नारायणास्त्राला (भगवंताच्या मारक रूपाला) आत्मरक्षणासाठी, तसेच साधना करून घेण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. असे केले, तरच त्या नारायणास्त्रापासून आपलेही लीलया रक्षण होईल !

५. ‘श्रीमन्नारायणस्वरूप ‘परात्पर गुरु डॉ. आठवले करत असलेल्या प्रत्येक कृतीतून साधकांचे भले होणार आहे’, अशी दृढ श्रद्धा ठेवून साधकांनी सीमोल्लंघन करावे !

भगवंत करुणानिधी आहे. तो ‘त्याच्या प्रगट होत असलेल्या मारक शक्तीची झळ साधकांना पोचू नये’, यासाठी त्यांना आपल्या पंखाखाली घेईल’, याची साधकांनी निश्चिती बाळगावी ! ‘श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेव यांनी आतापर्यंत जे केले, ते साधकांच्या भल्यासाठीच केले आहे. ते जे करतात, त्यातून साधकांचे भलेच होणार आणि ते जे करणार आहेत, त्यातून साधकांचे सर्वांगीण कल्याणच होणार आहे’, अशी ठाम श्रद्धा ठेवून आपण आपल्या वैचारिक बंधनांतून बाहेर पडून स्वतः सीमोल्लंघन करूया !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने झालेले हे चिंतन त्यांच्या श्री चरणी अर्पण !’

– श्री. संजोग अशोक टिळक, पुणे (२७.१०.२०२१)