30नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi
सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीविषयीची शास्त्रोक्त माहिती…
कोणत्याही देवतेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती कळली, तर तिच्याविषयी श्रद्धा वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. २९ सप्टेंबर या दिवशी आपण ‘शक्तींची निर्मिती’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
सृष्टीमध्ये एकूण नवमिती असून प्रत्येक मितीवर एकेक दुर्गादेवीचे आधिपत्य आहे. अशा एकूण ९ दुर्गा आहेत; म्हणून त्यांना ‘नवदुर्गा’ असे म्हणतात.
‘नऊ’ या आकड्याची वैशिष्ट्ये
१. ‘महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही (शक्तीची) तीन प्रमुख रूपे होत. या प्रत्येक रूपात आणखी दुसरी दोन रूपे प्रविष्ट होऊन तिघींचे त्रिवृत्करण झाले. मग या ९ रूपांना नवदुर्गा हे नाव मिळाले.’ या ९ रूपांतील प्रमुख गुणांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
टीप १ – एका मतानुसार स्थितीपेक्षा निर्मितीला अधिक शक्ती लागत असल्याने महासरस्वती ही रजोगुणाशी आणि जीवन सुखाचे जावे या संदर्भातील महालक्ष्मी ही सत्त्वगुणाशी संबंधित आहे. दुसर्या मतानुसार निर्मितीपेक्षा स्थितीसाठी अधिक शक्ती लागत असल्याने (चंचल) महालक्ष्मी रजोगुणाशी आणि ज्ञानदेवता महासरस्वती ही सत्त्वगुणाशी संबंधित आहे.
२. ‘शक्तीतंत्रात ‘९’ या अंकाला विशेष महत्त्व आहे. हा अंक शक्तीचे स्वरूप दर्शवतो. दशमानातील तो सर्वांत मोठा अंक होय. तसाच तो पूर्णांकही आहे; कारण नवाची कितीही पट केली, तरी येणार्या संख्येतील अंकांची बेरीज नऊच होते. पूर्ण नेहमी पूर्णच असते. शक्त्युपासनेत ९ हे शक्तीचे अंकप्रतीक ठरले आहे.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्तीचे प्रास्ताविक विवेचन’)