अयोध्येतील चौकाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव !

वीणेच्या ४० फुटी प्रतिकृतीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन !

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अभिवादन करताना नरेंद्र मोदी (उजवीकडे)

अयोध्या (उत्तरप्रदेश) – भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त २८ सप्टेंबर या दिवशी अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. या चौकात वीणेची एक ४० फूट लांबीची आणि १४ टन वजनाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रतिकृतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देतांना सांगितले की, जेव्हा अयोध्येत श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी भूमीपूजन झाले, तेव्हा लतादीदींचा मला दूरभाष आला होता. त्या पुष्कळ आनंदी होत्या. श्रीराममंदिराची उभारणी केली जात आहे, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.