समाजवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुसलमान व्यक्तीला करा, अन्यथा मुसलमानांसमोर इतर पर्याय उपलब्ध !

 ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन यांनी अखिलेश यादव यांना चेतावणी

उत्तरप्रदेशमध्ये यादव केवळ ७ टक्के, तर मुसलमान २५ टक्के असल्याचाही दावा !

डावीकडून मौलाना शहाबुद्दीन आणि अखिलेश यादव

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे समाजवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुसलमान व्यक्तीला बनवण्याची मागणी  बरेलवी उलेमा मौलाना शहाबुद्दीन यांनी केली. शहाबुद्धीन हे ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. ‘जर अखिलेश यादव यांनी असे केले नाही, तर मुसलमानांना इतर पर्याय उपलब्ध आहेत’, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

शहाबुद्धीन पुढे म्हणाले की, मुसलमानांनी मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव या दोघांना मुख्यमंत्री पदावर बसवले, त्यामुळे त्यांनी आता मुसलमानाला पक्षाचा अध्यक्ष बनवले पाहिजे. अखिलेश यादव मुसलमानांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे समाजवादी पक्ष आता विखुरला गेला आहे. उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजातील केवळ ७ टक्के लोकच आहेत, तर मुसलमानांची लोकसंख्या २२ ते २५ टक्के आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमानांच्या मतांसाठी अखिलेश यादव यांच्या वडिलांनी, म्हणजे मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेते दगड बांधून शरयू नदीत फेकली होती, त्यांना आता तरी मुसलमानांचे खरे स्वरूप लक्षात येईल का ?