कानपूर (उत्तरप्रदेश) येथील नगरपालिकेतील मुसलमान कर्मचार्‍यांनी नगरसेवकांना उष्टे पाणी आणि खाद्यपदार्थ थुंकून दिले !

दोघा मुसलमान कर्मचार्‍यांना कामावरून काढले !

 

प्रतीकात्मक छायाचित्र

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या कक्षामध्ये कंत्राटी मुसलमान कर्मचारी उष्टे पाणी, तसेच खाद्यपदार्थांवर थुंकून ते देत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पालिकाच्या अधिकार्‍यांना घेरावही घातला, तसेच त्यांना हटवून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचीही मागणी केली. यानंतर या कक्षातील दोघा कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले.

नगरसेवकांच्या तक्रारीनंतर अधिकार्‍यांनी येथील स्थायी कर्मचारी मुबीन याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ‘तौफिक नावाचा कंत्राटी कर्मचारी पिण्याचे पाणी उष्टे करून नगरसेवकांना देत होता’, असे सांगितले. त्यानंतर मुबीन आणि तौफिक यांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यांच्या जागेवर दोघा हिंदु कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. आता या दोघांची चौकशी करून त्यानंतर तौफिक यालाला कामावरून काढून टाकण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

अशी विकृती असणारे धर्मांध मानवतेला लज्जास्पद ! अशा घटनांविषयी देशातील एकही ढोंगी निधमीवादी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !