झारखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’ करणार्‍या आरजू मल्लिक याचे घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त !  

रांची – उत्तरप्रदेशच्या धर्तीवर झारखंडमधील बोकारो येथे ‘लव्ह जिहाद’ करून हिंदु तरुणीला फसवणारा आरजू मल्लिक याचे घर प्रशासनाने बुलडोझर चालवून जमीनदोस्त केले . आरजू मल्लिक याने धर्म लपवून हिंदु मुलीशी विवाह केला होता. त्यानंतर त्या मुलीला त्याच्या मित्रांच्या कह्यात देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मल्लिक याने मुलीवरील बलात्काराचा व्हिडिओही बनवला आणि त्याद्वारे तो मुलीला धमकावत होता. या प्रकरणी पीडित मुलीने ५ मुसलमान तरुणांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. तेव्हापासून आरोपी फरार आहेत. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, फरार आरोपी आरजू मल्लिक याच्या घरावर यापूर्वीच न्यायालयाच्या आदेशानुसार जप्ती आणण्यात आली होती. अतिक्रमण दाव्याच्या अंतर्गत पोलीस, न्यायदंडाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला.