#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि पितृऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. कालच्या अंकात श्राद्धाचे प्रकार आणि त्यांचे लाभ यांविषयीची माहिती आपण पाहिली. आज पिंडाला कावळा शिवणे, यामागील अध्यात्मशास्त्र, तसेच कावळा न शिवल्यास काय करावे, हे जाणून घेऊया.
१. कावळ्यामध्ये वासनात्मक विषम लहरी आकर्षित करण्याची क्षमता असणे
‘श्राद्धात पिंडदानाच्या माध्यमातून पितरांचे आवाहन करतात. पितरांच्या अतृप्त इच्छा पिंडाच्या माध्यमातून पुरवल्या जातात. सर्वसाधारण माणसात वासनांचे प्रमाण अधिक असते आणि म्हणून लिंगदेहातूनही विषम, म्हणजे रज अन् तम प्रधान विस्फुटित लहरी बाहेर पडतात. कावळा हा अधिकाधिक विषम लहरी आकर्षित करून घेतो. त्याला त्या जाणवतात. पितरांचा लिंगदेह जेव्हा पिंडाकडे आकृष्ट होतो, तेव्हा पिंड विषम लहरींनी भारित होतो. या लहरींकडे कावळा आकृष्ट होतो. पितर श्राद्धस्थळी येऊन त्यांची तृप्ती झाल्याचे सूचक म्हणजे, पिंडाला कावळा शिवणे. यालाच ‘कावळ्याने घास घेणे’, असे म्हणतात. अशा प्रकारे वासना असलेले लिंगदेह आणि माणसे यांच्यामधील कावळा हा एक दुवा आहे.’ – स्वामी विद्यानंद, मुंबई (वर्ष १९८७)
२. पिंडाला कावळा न शिवणे
एखाद्या लिंगदेहाची इच्छा पूर्ण करण्याबद्दल कुणी वचन दिले नाही, तर त्याच्यातून बाहेर पडणार्या मारक लहरींमुळे कावळा पिंडाजवळ आला, तरी त्याला पिंडाला स्पर्श करता येत नाही.
३. पिंडाला कावळा न शिवल्यास योजावयाचा पर्याय
बराच वेळ पिंडाला कावळा शिवला नाही आणि मृत व्यक्तीची कोणती इच्छा अपूर्ण आहे, हे समजू शकले नाही, तर इच्छापूर्तीचे आश्वासन देता येणार नाही. जर २४ घंट्यांनंतरही कावळा शिवला नाही, तर दर्भाचा कावळा करून पिंडाला लावतात.
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English