गढवा (झारखंड) येथे धर्मांधाने हिंदु तरुणाला पेट्रोल ओतून पेटवले !

गढवा (झारखंड) – येथील बन्सीधर नगरात दीपक सोनी या तरुणाला अस्मुद्दीन अंसारी याने पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली आहे. उंटारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चित्तविश्राम गावात हा प्रकार घडला. सोनी हा गंभीररित्या भाजला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलीस अंसारी याचा शोध घेत आहेत.

पीडित दीपक सोनी यांनी सांगितले, ‘माझ्या घराजवळ अस्मुद्दीन अंसारी आणि अन्य एका व्यक्ती यांच्यात भांडण चालू होते. त्यानंतर मी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी पेट्रोलची विक्री करतो. मी त्याला ‘तुम्ही भांडण का करत आहात ?’, असे विचारले असता त्याने मला ‘तुम्ही माझे मालक आहात का ?’, अशी विचारणा करून शिवीगाळ केली. त्यानंतर बाटलीत पेट्रोल आणून त्याने माझ्यावर अंगावर टाकले आणि पेटवून दिले.’

संपादकीय भूमिका

झारखंडमध्ये काही दिवसांपूर्वीच एका मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला जाळून मारले होते. ही घटना ताजी असतांना पुन्हा अशा प्रकारची घटना घडते म्हणजे झारखंड हिंदूंसाठी पाकिस्तान बनवल्याचे दर्शक आहे ! याला राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकारच उत्तरदायी आहे !