कोईम्बतूर (तमिळनाडू) येथे मुसलमानबहुल भागात मुसलमान संघटनेच्या अनुमतीने गणेशोत्सव साजरा करा !

 मिरवणूक काढण्यास बंदी

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने कोईम्बतूर शहरातील पोलिसांना स्थानिक मुसलमानांच्या संघटनेच्या सहमतीनंतर हाउसिंग बोर्ड कॉलनीमध्ये श्री गणेशमूर्ती स्थापन करून गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती दिली आहे. या शहरातील पुलकाडू कॉलनीमध्ये गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी आणि ३१ ऑगस्टला असणार्‍या श्री गणेशचतुर्थी उत्सव साजरा करण्यासाठी अनुमती द्यावी; म्हणून महालक्ष्मी नावाच्या महिलेने न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांना वरील आदेश दिला आहे. विशेष म्हणजे या कॉलनीमध्ये मोठ्या संख्येने मुसलमान रहातात.

१. महालक्ष्मी यांनी पोलिसांकडे केलेल्या अर्जामध्ये अन्य धर्मांतील नागरिकही गणेशोत्सव साजरा करण्यात सहभागी होण्यास इच्छुक आहेत. या काळात मुसलमानांची हिंदूंना अन्नदान करण्याचीही सिद्धता आहे. त्यामुळे उत्सवासाठी अनुमती द्यावी, अशी मागणी केली होती.

२. पोलिसांच म्हणणे होते की, हा भाग मुसलमान लोकसंख्येने घेरलेला आहे. तेथे गणेशोत्सव साजरा केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. (मुसलमानबहुल भागात हिंदूंनी त्यांचा सण साजरा केल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न का उपस्थित होतो ? याचे उत्तर पोलीस आणि मुसलमान कधी देणार ? संपूर्ण भारत हिंदूबहुल आहे; मात्र ईद, मोहरम या सणांच्या वेळी असा प्रश्‍न कधीच निर्माण होत नाही; मात्र ‘लहानशा संकुलात मुसलमान बहुसंख्य असल्यावरही हिंदूंसाठी असा प्रश्‍न का निर्माण होतो ?’, याचा विचार ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी करणार आहेत का ? – संपादक)

३. न्यायालयामध्ये या दोन्ही गोष्टी मांडण्यात आल्यावर न्यायालयाने निर्णयात म्हटले की, याचिकाकर्त्यांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी स्थानिक जमात समितीकडून प्रतिज्ञापत्र घेऊन पोलिसांकडे आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात यावे. यात गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यात येईल, असे स्पष्ट करावे. तसेच पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर उत्सवाच्या ठिकाणी योग्य संरक्षण पुरवावे. तसेच मिरवणूक काढण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. (हिंदूंच्या देशात हिंदूंनाच त्यांच्या धार्मिक मिरवणुका काढण्यास बंदी येते, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘कोईम्बतूर भारतात आहे कि पाकिस्तानात ?’, असा प्रश्‍न कुणाच्याही मनात उपस्थित होऊ शकतो !
  • ‘भारताच्या राज्यघटनेने प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार पालन करण्याचे धर्मस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे मुसलमानबहुल भागात हिंदूंना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांना मुसलमानांची अनुमती घेण्याविषयी न्यायालयाने दिलेला निर्णयामुळे हिंदूंचे धर्मस्वातंत्र्य धोक्यात आले आहे’, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य के काय ?
  • या निर्णयामुळे भारतातील प्रत्येक मुसलमानबहुल भागांत हिंदूंना सण साजरे करण्यासाठी मुसलमानांची अनुमती घेण्याचा पायंडा पडणार नाही का ?
  • ‘हिंदूबहुल भागातील मुसलमानांनीही त्यांचे सण साजरे करण्यासाठी हिंदूंची अनुमती घ्यावी’, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ?
    ‘या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी हिंदूंनी तात्काळ या निर्णयाला आव्हान देऊन सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, असेच सामान्य हिंदूंना वाटते !