शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची कर्नाटक सरकारला नोटीस

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

नवी देहली – कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर घालण्यात आलेल्या बंदीला कर्नाटक उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. यावर येत्या ५ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.