सहारनपूर (उत्तरप्रदेश) – देवबंद येथील शेख-उल-हिंद कॉलोनीमध्ये पोलिसांनी फैजान नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये धाड टाकून फैजान, महंमद छोटन आणि सुफियान या ३ गोतस्करांना अटक केली आहे, तर एका महिलेसह ३ आरोपी पळून गेले. पोलिसांनी या घरातून ५० किलो गोमांस आणि मांस कापण्याची शस्त्रे जप्त केली. अटकेतील छोटन याच्यावर यापूर्वीच ७ गुन्हे नोंद आहेत. त्यांतील ५ गुन्हे गोहत्येशी संबंधित आहेत. तसेच त्याच्यावर गुंडा कायद्याच्या अंतर्गतही गुन्हा नोंद आहे. फैजान याच्यावरही ७ गुन्हे असून त्यातील ४ गोहत्येच्या संदर्भात आहेत. (या दोघांवर पूर्वीच गोहत्येचे गुन्हे आहेत, तर त्यांना आतापर्यंत कठोर शिक्षा का झाली नाही? जर ते सतत जामिनावर बाहेर येऊन तेच तेच गुन्हे करत असतील, तर कधीतरी गोहत्या थांबणार आहे का ? असे कायदे आणि प्रणाली पालटणेच योग्य ! – संपादक)
50 Kg गोमांस के साथ देवबंद से 3 गौ तस्कर गिरफ्तार, महिला सहित 3 भागे: पहले से ही अपराधी है फैजान और मोहम्मद छोटन#Deoband #Beefhttps://t.co/wguHWQqdwC
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 28, 2022
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये गोहत्या बंदी कायदा असतांनाही अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील, तर या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद वाढवून आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |