(म्हणे) ‘टिपू सुलतान याला ‘मुसलमान गुंड’ म्हटल्यास जीभ कापू !’

कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपचे आमदार ईश्‍वरप्पा यांना अज्ञातांकडून धमकी !

कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपचे आमदार ईश्‍वरप्पा

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील भाजपचे आमदार आणि माजी मंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी टिपू सुलतान याचा ‘मुसलमान गुंड’ असा उल्लेख केला होता. त्यावरून ईश्‍वरप्पा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. यात म्हटले आहे, ‘जर पुन्हा टिपू सुलतान याचा ‘मुसलमान गुंड’ म्हणून उल्लेख केला, तर जीभ कापू.’ हे पत्र त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले आहे.

कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यदिनी टिपू सुलतान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फलक लावण्यावरून वाद झाला होता. त्यावरून ईश्‍वरप्पा यांनी टिपू सुलतान याला ‘गुंड’ म्हटले होते. याविषयी ईश्‍वरप्पा यांनी म्हटले होते, ‘मला मुसलमान समाजातील ज्येष्ठांना सांगायचे आहे की, ‘सर्वच मुसलमान गुंड आहेत’, असे माझे म्हणणे नाही. मुसलमान समाजातील ज्येष्ठांनी भूतकाळात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ‘गुंडगिरीत सहभागी होणार्‍या तरुणांना त्यांनी मार्गदर्शन करावे’, असा माझा सल्ला आहे. अन्यथा सरकार यावर कारवाई करेल आणि त्यांना या कारवाईचा सामना करावा लागेल.

संपादकीय भूमिका

यावरून अत्याचारी मुसलमान आक्रमकांचा उल्लेख ‘अत्याचारी’ किंवा ‘गुंड’ असा करतांनाही हिंदूंना १० वेळा विचार करावा लागेल. अशी दहशत माजवणार्‍यांवर सरकार कधी कारवाई करणार !