हमीरपूर (उत्तरप्रदेश) – येथील महिला दिवाणी न्यायाधिशांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी अधिवक्ता महंमद हारून यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिवक्ता हारून यांनी महिला न्यायाधिशांविषयी अश्लील विधाने केली होती आणि गैरवर्तनही केले होते. ते या महिला न्यायाधिशांना भ्रमणभाषवर अश्लील संदेश पाठवत होते. न्यायालयात कामाच्या वेळी त्यांच्याकडे वाईट दृष्टीने पहात होते. इतकेच नव्हे, तर सायंकाळी काम संपल्यानंतर ते महिला न्यायाधिशांचा पाठलागही करत होते. याविषयी या न्यायाधिशांनी हारून यांना चेतावणीही दिली होती; मात्र त्यांनी ते ऐकले नाही. त्यामुळे महिला न्यायाधिशांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चौकशीनंतर कारवाई करण्यात येणार आहे.
‘घूरता था, पीछा करता था, गंदे मैसेज भेजता था’: हमीरपुर में वकील मोहम्मद हारून के खिलाफ महिला जज ने की शिकायत, छेड़छाड़ का भी आरोप#Hamirpur #UttarPradeshhttps://t.co/e64ilCEOWy
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 20, 2022
अशी व्यक्ती आणि अधिवक्ता समाजासाठी कलंक ! – हमीरपूर बार असोसिएशन
या प्रकरणी ‘हमीरपूर बार असोसिएशन’चे अध्यक्ष दिनेश शर्मा म्हणाले, ‘‘अधिवक्ता हारून यांचा आम्ही निषेध करतो. अशा अधिवक्त्यांच्या विरोधात कठोरातील कठोर कारवाई करण्याची आम्ही मागणी करतो. जर पोलिसांच्या चौकशीत त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले, तर आम्ही अधिवक्ता हारून यांची अनुज्ञप्ती रहित करण्याची मागणी करू. अशी व्यक्ती आणि अधिवक्ता समाजासाठी कलंक आहे.’’
मो० हारून जैसे वकील अधिवक्ता समाज के लिए बड़ा कलंक है – दिनेश शर्मा (अध्यक्ष, बार एसोसिएशन हमीरपुर)
(मोहम्मद हारून पर हमीरपुर में महिला सिविल जज के साथ छेड़खानी करने का मुकदमा दर्ज हुआ है)@dmhamirpurup @barcouncilindia @BarCouncilofUP pic.twitter.com/QDkXhWxh5A
— Sudarshan UP (@SudarshanNewsUp) August 20, 2022
संपादकीय भूमिकाधर्मांध कितीही शिकले आणि मोठे झाले, तरी त्यांच्यातील मूळ गुन्हेगारी आणि वासनांध वृत्ती जात नाही, हेच यातून लक्षात येते ! याविषयी निधर्मी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |